नानागंधे तुलसीमाळा |
1009.
नानागंधे तुलसीमाळा | वैष्णवी घातलिया गळा | नमस्कार करिती गोपाळा | चरणरजा वंदिती ॥१॥
दोही बाही देव्हडे |संत सनकादिक गाढे | जयजयकार पुढे |महाशब्दे गर्जिन्नले॥२॥
ऐसे इंद्रायणीचा तटी | हरि रुक्मिणी जगजेठी | संत सनकादिकांची गोमटी | मांदी मिळाली असे ॥३॥
तंव पुंडरिके नमस्कार केला | म्हणे तू का गा तेथे विठो उगवला | बहुत दिवस येथेंचि राहिला | या ज्ञानदेवाकारणे ॥४॥
तरी पंढरीहुनि हे श्रेष्ठ| तू येथे उभा अससी प्रगट | भूमी उतरले वैकुंठ | ज्ञानदेवाकारणे ॥५॥
बहुत दिवस येथेचि जाले | मी न देखे विटेवरी जंव पाऊले | तंव नयन माझे भुकेले | न राहाती देवराया ॥६॥
देव म्हणती पुंडरिका | तू भक्त माझा निजसखा | आणि हा ज्ञानदेव देखा | दुजा न देखो आणिक ॥७॥
हे संत सनकादिक माझे | यांचेनि समागमे माझे बीजे | नामा डोरिन्नला यांचे चरणरजे |मग जावो रे पंढरीसी ॥८॥
