आभाविकांसी तो जवळीचा
38.
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥ वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥ एका जनार्दनीशीण गोपीकांसी । तेणे हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
