वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 199. खल-दुर्जनास उपदेश

दुर्जनाची बुद्धि वोख

🙏 4. संत नामदेव · ABH-082148 · अभंग क्र. १९०२

1902.
दुर्जनाची बुद्धि वोखटी दारुण | आपण मरोनि दुजिया मारी ॥१॥
माशी जाता पोटी मेली तेचि क्षणी | प्राण्या वोकवूनि कष्टी करी ॥२॥
दीपकाची ज्योति पतंग नासला | अंधार पडिला जनांमध्ये ॥३॥
तैसा नैसर्गिक स्वभाव दुष्टांचा | शेखी ज्याचा त्यासी फळा येतो ॥४॥
जाली सज्जनाची संगति कदापि | जाईना तथापि त्याची क्रिया ॥५॥
सहज मळले धुता शुद्ध होय | विचव्याचा काय डाग जातो ॥६॥
वज्रहि फुटेल नभहि तुटेल | भला तो होईल ऐसा नव्हे ॥७॥
नामा म्हणे कुंभपाकाचा तो धनी | तयामी भल्यांनी बोलू नये ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग