मागण्याची न करु गोष्
712.
मागण्याची न करु गोष्टी ।
तुम्हा पोटी भय वाटे ॥१॥
नामचि तुमचे पुरे देवा ।
न करु हेवा आणिक ॥२॥
माझे आहे स्वाधीन मन ।
न इच्छी मान धन काही ॥३॥
निळा म्हणे सत्य साचा ।
हाचि संकल्पाचा निर्धार ॥४॥
712.
मागण्याची न करु गोष्टी ।
तुम्हा पोटी भय वाटे ॥१॥
नामचि तुमचे पुरे देवा ।
न करु हेवा आणिक ॥२॥
माझे आहे स्वाधीन मन ।
न इच्छी मान धन काही ॥३॥
निळा म्हणे सत्य साचा ।
हाचि संकल्पाचा निर्धार ॥४॥