भेटी गेला पुंडलिका
420.
भेटी गेला पुंडलिका
हे सनकादिका जाणवले ॥१॥
मग ते धावोनि आले ।
उभयता भेटले देवभक्ता ॥२॥
करुनिया पूजाविधी ।
लागती पदी स्वांनंदे ॥३॥
निळा म्हणे मंत्रांजुळी ।
वोपिती निढळी दिव्य सुमने ॥४॥
420.
भेटी गेला पुंडलिका
हे सनकादिका जाणवले ॥१॥
मग ते धावोनि आले ।
उभयता भेटले देवभक्ता ॥२॥
करुनिया पूजाविधी ।
लागती पदी स्वांनंदे ॥३॥
निळा म्हणे मंत्रांजुळी ।
वोपिती निढळी दिव्य सुमने ॥४॥