तुळशी वंदितां मस्तकी
3404.
तुळशी वंदितां मस्तकी । धन्य धन्य तिही लोकी ॥१॥
तुळशी करता नमस्कार । उतरे पार संसार ॥२॥
तुळशीचे नाम घेता । हरे भवभवयाची चिंता ॥३॥
तुळशीचा करता जप । नुरे पाप जन्मांतरींचें ॥४॥
तुळशीची करता सेवा । होय देवा प्रिय तो ॥५॥
तुळशीचें अनुष्ठान । एका जनार्दनी शरण ॥६॥
