वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

गोधने चाराया जातो शा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073243 · अभंग क्र. १५४

154.
गोधने चाराया जातो शारंगपाणी । मार्गी भेटली राधिका गौळणी ।
कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥
यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।
येरु रुदत सांगतो मातेपाशी । माझा चेंडु लपविला निरिपाशी ॥२॥
राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाही वो मजपाशी ।
परि हा लटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडिता चेंडु पडे धरणीसी ॥३॥
यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गी बैसता क्षण एक मुरारी ।
एका जनार्दनी विनवी श्रीहरी । नाम घेता पातके जाती दुरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग