वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ९, अंबुला अभंग ९१५ ते ९३२

सुची अंबुला ज्ञान घर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074588 · अभंग क्र. ९२२

922.
सुची अंबुला ज्ञान घराचारु ।
भक्ति हे साकारु आवडली ॥१॥
काय सांगू माय निर्गुण अंबुला ।
शून्यी मिळाला नाही ठाई ॥२॥
रखुमादेविवरु साकार अंबुला ।
मज पूर्ण आला बाईये वो ॥३॥

अर्थ :
सुची म्हणजे सूक्ष्माहूनही सूक्ष्म असणारा परमात्मा पति झाल्यानंतर माझा व्यवहार ज्ञानरुप झाला. त्याच्या साकार स्वरुपाची भक्ति मला फार आवडली. तो निर्गुण पति शून्य जी अविद्या तिचे कार्य जो प्रपंच त्यात मिळाला नाही. ते निर्गुण रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते साकार होऊन माझ्याशी लग्न लावण्यास आले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग