वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ९, अंबुला अभंग ९१५ ते ९३२

दुरळु अंबुला केला गे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074587 · अभंग क्र. ९२१

921.
दुरळु अंबुला केला गे बाई ।
ब्रह्मादिका तो न पडे ठाई ॥१॥
हालो नये चालो नये ।
सैरावैरा काही बोलो नये ॥२॥
अंबुला केला धावे जरी मन ।
बुडती बेचाळीस जाती नाक कान ॥३॥
मागील केले ते अवधेची वावो ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥४॥

अर्थ :
इंद्रिये, मन, बुद्धि त्यांची कारण पंचमहाभूते, त्यांचे कारण अविद्या इतक्यांहून दूर असलेल्या ब्रह्मादिकांना कळत नाही त्याला मी पति केला. त्या पतिस्वरुपाच्या ठिकाणी चलनवलन वगैरे क्रिया किंवा कोणत्याही तहेचे भाषण खपत नाही. आता आनंदघन पति करुन जर मन प्रपंचाकडे धांवेल तर बेचाळीस कुळे नरकांत पडून नाक कान जातील. म्हणजे सर्वप्रकारे फजिती होईल. एकदा त्या परमात्म्याला पति केला म्हणजे मागील देहात्मभावादि सर्वच खोटे होऊन जातात. असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझा पति आहेत असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग