वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पियूनिया बाहे गे ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075788 · अभंग क्र. ५९२

592.
पियूनिया बाहे गे ।
नीट उभी राहे ।
बेडकीचे परी तोंड हालविसी काये ॥१॥
झिंपा गे झिंपा रामचरण झिंपा ।
विषयांचे गोडि वाया नको करू खेपा॥धृ॥
करूणेचे बोल माझे नको करू फोल ।
धरी भक्तिभाव जेणे वसे ज्ञानवोल ॥२॥
नाच संतसंगे सखये अति प्रेमरंगे ।
जेणे तज कृपा कीजे प्रीती पांडुरंगे ॥३॥
पंढरीचे पेठ सखये सुख आहे मोठे ।
धाउनीया जाय बाई सर्व पांग फिटे ॥४॥
नका करू फेरे बाई चौर्‍यांशीचे घेरे ।
धरा एकभाव जेणे भव सोडवी रे ॥५॥
मुखी नाम बोले बाई प्रेमभक्ति डोले ।
सुखानंद रसे बाई स्वानुभवे बोले ॥६॥
मध्यमेचे पारी सखये मेळवोनी पोरी ।
सदा अंतरंग खेळा उन्मनीच्या भरी ॥७॥
बहिणी घाली झिंपा ।
करूनी सद्गुरूकृपा ।
संतचरणी विनटली मिळुनी ज्ञानदीपा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग