जीवन्मुक्त केले नामा
1514.
जीवन्मुक्त केले नामाचे गजरी सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥
काय उतराई होउ तुज देवा | उदारा केशवा मायबापा ॥२॥
अंतरी देऊन प्रेमाचा जिव्हाळा | मुक्तीचा सोहळा भोगविसी ॥३॥
नामा म्हणे वेदा न येसी अनुमाना | वर्णिता पुराणा पडियेले ठक |॥४॥
