वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ७, वासुदेव अभंग

गातो वासुदेव मी ऐका

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073060 · अभंग क्र. ५९

59.
गातो वासुदेव मी ऐका । चित्त ठेवुनि ठायी भावे एका ।
डोळे झाकुनि रात्र करू नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥
राम राम स्मरा आधी । लाहो करा गांठ घाला मूळबंदी ।
सांडा वाउगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदी गा ॥धृ॥
ऐसा अल्प आयुषी मानवी देह । शत गणिले ते अर्ध रात्र खाय ।
पुढे बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरले ते पाहे गा ॥२॥
क्षणभंगुर नाही भरवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा ।
न चळे बळ पडेल मग फासा । पुढे हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥
कांही थोडे बहुत लागपाठ । करा भक्ती भाव धरा बळकट ।
तन मन ध्यान लावुनिया नीट । जर असेल करणे गोड शेवट गा ॥४॥
विनवितो सकळा जना । कर जोडुनि थोरा लाहना ।
दान इतुले द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम ह्मणा गा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग