जया सुखाची आशा आहे ।
468.
जया सुखाची आशा आहे । त्यांनी जावे पंढरीसी ॥१॥
अमुपासी अमुप देता । परी भरले ते सर्वथा ॥२॥
सुखाचिया भरल्या राशी । पाहिजे त्यासी त्यांनें घ्यावें ॥३॥
न सरेचि ब्राह्मादिकीं । भरलेंदेखा भरतें ॥४॥
एका जनार्दनी सुख । अलौकिक देख पंढरीये ॥५॥
