सुंदर माझे जाते गे फ
227.
सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके । ओव्या गाऊ कौतुके तु येरे बा विठ्ठला ॥1॥
जीवशीव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे । लावूनी पांची बोटे गे तु येरे बा विठ्ठला ॥2॥
सासु आणि सासरा दिर तो तिसरा । ओव्या गावू भ्रतारा तु येरे बा विठ्ठला ॥3॥
बारा सोळा गडणी अवघ्या त्या कामिनी । ओव्या गावू बैसूनी तू येरे बा विठ्ठला ॥4॥
प्रपंच दळण दळीले पीठ भरिले । सासूपुढे ठेविले तू येरे बा विठ्ठला ॥5॥
सत्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिले । पाप ते उतू गेले तू येरे बा विठ्ठला ॥6॥
जनी जाते गाईल कीर्त राहील । थोडासा लाभ होईल तू येरे बा विठ्ठला ॥7॥
