वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 16. मुरली - अभंग १४८ ते १६५

गोधनें चाराया जातो श

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085724 · अभंग क्र. १६३

163.
गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी ।
कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥
यशोदा म्हणे नाटका हृषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।
येरु रुदत सांगतो मातेपाशीं । माझा चेंडुं लपविला निरिपाशीं ॥२॥
राधिका म्हणे यशोदे परियेसी । चेंडु नाही नाही वो मजपाशी ।
परि हा लाटिका लबाड हृषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी ॥३॥
यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी । मार्गीं बैसता क्षण एक मुरारी ।
एका जनार्दनी विनवीं श्रीहरी । नाम घेता पातकें जती दुरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग