वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

कई देखता होईन डोळी ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072898 · अभंग क्र. ४०७२

4072.
कई देखता होईन डोळी । सकळा भूती मूर्ती सांवळी ।
जीवा नांव भूमंडळी । जळी स्थळी काष्ठी पाषाणी ॥१॥
ऐसी कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन ।
प्रेमसागरी बुडईन । होईल स्नान अनुतापी ॥धृपद॥
ऐसा कई येईन दैवास । दृश्य हे नासोनि जाईल आस ।
सदा संतचरणी देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥२॥
कई नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार ।
अमृत ते पृथ्वीतळी सागर । वाहातील पूर आनंदाचे ॥३॥
प्रसन्न दया क्षमा शांती । कई नवविधा होईल भक्ती ।
भोगईन वैराग्य संपत्ती । मनोरथ कळती तई पुरले ॥४॥
तुकयाबंधु म्हणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पाग ।
म्हणोनि घातले साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥५॥

अर्थ :
मी माझ्या डोळयाने देवाची सावळी मूर्ती सर्व प्राणीमात्रामध्ये केव्हा पाहीन ? प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भूमंडळामध्ये जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी देवा तुझी सावळी मूर्ती मी केव्हा पाहीन ? मी या जगाचा जीव होईन अशी कृपा नारायण माझ्यावर केव्हा करेन ? मी अनुतापाने म्हणजे पश्चात्तापाने स्नान करुन प्रेमसागरात बुडेल अशी कृपा नारायण माझ्यावर करील काय ? सर्व दृश्य पदार्थांचा नाश होऊन माझी आशा नाश पावेल, आणि माझ्या देहाचा नेहमी संतांच्या चरणाजवळ वास होईल आणि त्यांचे उच्चिष्ट मला तृप्ती होईपर्यंत सेवन करण्यास मिळेल असे माझे भाग्य केव्हा उदयास येईल ? माझ्या सुखाचा अंत:पार लागणार नाही, आणि माझ्या आनंदामृताचे पूर पृथ्वीतळावर वाहून त्याचा समुद्र तयार होण्याचा नवस मी केला आहे त्याला अंकुर म्हणजे फळ केव्हा येतील ? माझ्यावर दया, क्षमा, शांती हे प्रसन्न केव्हा होतील आणि केव्हा मला नवविधा भक्ती प्रा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग