वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 16. मुरली - अभंग १४८ ते १६५

सुंदर मुख साजिरे कस्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085722 · अभंग क्र. १५७

157.
सुंदर मुख साजिरे कस्तुरी मळवटीं । मुरली वाजवीत उभा यमुनेचे तटीं ।
गोपवेष शोभे खांदा कांबळी हाती काठी । तो नंदनंदन देखीला जगजेठी वो ॥१॥
मजुंळ मंजुळ वाजवी मुरली । ऐकता माझी चित्तवृत्ति हरली ॥धृ.॥
चारी वेद जया गाताती आनंदें । तो गोकुळीं गाई चारी परमानंदे ।
श्रुतिशास्त्रे वेधला जयाचिया छंदें । तया गोवळा म्हणती कान्हा आनंदें ॥२॥
ऐशी आवडी भक्तिंची देखा । उच्छिष्ट खाता कांही न धरी शंका ।
एका जनार्दनी भुलला तयाचिया । सुखा वैकुंठ नावडेचि देखा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग