त्याचे सुख नाही आले
23.
त्याचे सुख नाही आले अनुभवा । कठिण हे जिवा तोंचिवरी ॥१॥
मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा । अंतर हे संगा नेदी पुढे ॥२॥
तुका म्हणे सर्वविशी हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥३॥