रामनाम वसे ज्याचे मु
817.
रामनाम वसे ज्याचे मुखी नित्य । त्याचेनि पतीत उद्धरण ॥१॥
रामनाम मंत्र जपे नित्यकाळ । त्यासी कळिकाळ हात जोडी ॥२॥
रामनामी त्याची जडली चित्तवृत्ती । वृत्तीची निवृती झाली त्यासी ॥३॥
एका जनार्दनी जपे रामनाम । तेणे पूर्ण काम स्वये झाला ॥४॥
