सगुण ते ब्रह्म विटेव
500.
सगुण ते ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणी कष्ट होऊम नेदी ॥१॥
देऊनिया क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठी ॥२॥
भजन भक्तांचे मानिसी वचन । नाम नारायणा ह्मणे कांरे ॥३॥
उफराटी वदवी वाल्मिका नामाचा । शतकोटी संख्या प्रविस्तार ॥४॥
नामा ह्मणे देवा भक्तिचे पै पिसे । त्यालागी हव्यासे होसी जाण ॥५॥
