नामे पाषाण तरले । मह
1076.
नामे पाषाण तरले । महापापी उद्धरिले । राक्षसादि आसुर तरले । एका नामे हरिच्या ॥१॥
घेई नाम सदा । तेणे तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभुतांची निश्चये ॥२॥
हो का पंडित ब्रह्माज्ञानी । तरती तारिती मेदिनी । शरण एका जनार्दनी । नाम उच्चरणीं आनंद ॥३॥
