जगा सुख भोगणे आहे ।
35.
जगा सुख भोगणे आहे । सेवा विठोबाचे पाय ॥
शुध्द करा तुमचे मन । लावा विठोबासी ध्यान ॥
दुष्टबुध्दी दुर करा । तोडा अविद्येचा थारा ॥
निवळ करा अंतःकरण । तुम्हा जवळी नारायण ॥
बोधला म्हणे भाव धरा । तारु निर्वाणीचा खरा ॥