भाग्याचा उदय झाला ।
1758.
भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला ॥१॥
तेंणे आनंदाचे पुर । लोटताती निरंतर ॥२॥
प्रेम सप्रेम भरतें । अंगी उतार चढते ॥३॥
आली आनंदलहरी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥
1758.
भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला ॥१॥
तेंणे आनंदाचे पुर । लोटताती निरंतर ॥२॥
प्रेम सप्रेम भरतें । अंगी उतार चढते ॥३॥
आली आनंदलहरी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥