शुध्द सात्विकी ब्राम
888.
शुध्द सात्विकी ब्राम्हण ।
सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण् ॥१॥
रजतमे वैश्य निर्माण ।
शूद्रा तमो निर्मिता ॥२॥
नाना याति नाना भेद ।
यांपासुनी शाखा विविध ॥३॥
निळा म्हणे निषिध्द तमी ।
अनामिकादि पापकर्मी विटाळ ॥४॥
हे तो याति स्वाभाव गुण ।
इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥५॥
अवघे ठायी पंचभौतिक ।
आत्मा सकळा व्यापक एक ॥६॥
निळा म्हणे गुणवांटणी ।
योगी विभाग चहू वर्णी ॥७॥
