काय गुण दोष माझे विच
1441.
काय गुण दोष माझे विचारिसी आहे मी तो राशी अपराधांची ॥१॥
अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत अखंड दुश्चित आचरलो ॥२॥
स्वप्नी देवा तुझी नाही घडली भक्ति | पुससी विरक्ति कोठुनिया ॥३॥
तूंची माझा गुरु तूंची तारी स्वामी | सकळ अंतर्यामी गाऊ तुज ॥४॥
नामा म्हणे माझे चुकवी जन्ममरण | नको करू शीण पांडुरंगा ॥५॥
