बांधिले राहीना वैरले
374.
बांधिले राहीना वैरले खाईना । दवडिले जाईना जाणते हो ॥१॥
तय खुंटा नांदावे सौरसे बांधावे । कशाने करावे वोढाळे हो ॥२॥
तया नेत्र ना पाय तिन्ही एक पाहे । न देखावे ते ठाय देखताहे ॥३॥
नामा म्हणे श्रोता विचारावे ज्ञानी । केश-वाचे नयनी उतरला ॥४॥
