१०२३, अभंग :- नाही सुगंधाची लागत लावणी । लावावी ते मनी शुद्ध होता :- संत तुकाराम सार्थ गाथा
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग – १०२३
नाही सुगंधाची लागत लावणी । लावावी ते मनी शुद्ध होता ॥१॥
वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे । कीर्ती मुख त्याचे नारायण ॥धृपद॥
प्रभा आणि रवि काय असे आन । उदयी तव जन सकळ साक्षी ॥२॥
तुका म्हणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाही पुन्हा ॥३॥
अर्थ
सुगंध उत्पन्न करण्याकरता कोणत्याही प्रकारची पेरणी करावी लागत नाही तर जसे फुल असेल तसे सुगंध आपोआप तयार होतो अगदी त्याचप्रमाणे मन शुद्ध झाले की सद्गुण ही आपोआप तयार होते. सद्गुण व कीर्ती हे दोन्ही गुण चांगल्या मनुष्याचे जसे सुगंध वाऱ्यासारशी पसरते तसे त्यांचे सज्जन व्यक्तींचे हे सद्गुण आणि कीर्ती वाऱ्यासारशी पसरते व त्यांची व कीर्ती सांगणारे मुखही नारायणाचे चसते. सूर्य आणि प्रकाश हे दोन्ही वेगवेगळे आहेत काय तर नाही याला सर्व लोकही साक्षी आहेत तसेच सज्जन व्यक्ती तो जेथे जेथे जात असतो तेथे त्याची कीर्ती व सद्गुण हे आपोआपच प्रसारित होतात. तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला सायास करायचेच असेल तर सत्यासाठी सायस करा कारण ज्याप्रमाणे नमिताचा नाश होत नाही त्याचप्रमाणे तर त्याचाही कधीच नाश होत नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
