👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
अभंग ८०५
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ८०५
तुझी सेवा करीन मनोभावें वो । माझें मन गोविंदी रंगलें वो ॥१॥ नवसिये नवसिये माझे नवसिये वो । पंढरीचे दैवतें विठ्ठलें नवसिये वो ॥२॥ बापरखुमादेवीवरें विठ्ठलें वो । चित्त चैतन्य चोरूनी नेलें वो ॥३॥
अर्थ:-
हे पंढरीराया तुझी सेवा मी मनोभावाने करीन त्याचे कारण माझे मन तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी रंगून गेले आहे. भक्तांचे नवस पूर्ण करणाऱ्या हे देवा, पंढरीनाथा तूं धांवत येऊन मला भेट दे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी माझे चित्तातील चैतन्य चोरून नेल्यामुळे आत्मस्वरूपाशी ऐक्य केले असे माऊली सांगतात.