ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.773

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७७३

एकतत्त्व साधी तंव हारपलों तेथ । मज पाहता येथ मी नाहीं ॥१॥ काय करूं सांगा कैसा हा आकळे । एकतत्त्वीं मिळे हृदयीं गे बाई ये ॥२॥ संपादनी नट नटोनियां हरि । एकरूपें करी आपण्या ऐसे ॥३॥ ज्ञानदेवी चित्त तत्त्वसार हरिं । चित्तानुलहरी झेपावली ॥४॥

अर्थ:-

 मी एकतत्त्व सिद्ध करू गेले तो तेथे माझा मीपणाच हरपून गेले याला काय करू सांगा? हा परमात्मा कसा आकलन होईल? मला वाटते माझे हृदयांतच एकत्वाने तो आहे. हा नटधारी श्रीहरि अनंतरूपाने नटून त्या रूपाने संपादनी करतो, आणि पहाणायास आपल्याप्रमाणेच एकरूप करतो. अनात्म तत्वातील सत्य सार जो परमात्मा श्रीहरि तो चित्तांत व्यापल्यानंतर चित्ताच्या अनंत लहरीप्रमाणे तो नटतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading