ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.692

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९२

माझी प्रकृति निष्कृति जाली । ब्रम्हीं सामावली बाईये वो ॥१॥ देहेंवीण ब्रह्म देखें देहेवीण ब्रह्म देखे । तेणें निर्गुण राखे रोखावलें ॥२॥ जाणतां म्हणोनी नेणतां पैं गेलें । शेखी आपणातें विसरलें बाईये वो ॥३॥ रखुमादेविवरू नेणोनी जाणितला । जाणपणे निमाला माझ्या ठायीं ॥४॥

अर्थ:-

माझी प्रकृति निष्कत्ती म्हणजे क्रियाशून्य होऊन ब्रह्माच्या ठिकाणी सामावली. ते ब्रह्म देहात्मभाव टाकूल पहा, जो असे ब्रह्म पाहील तो निर्गुण रूपाने होऊन जाईल. आम्ही परमात्मस्वरूप जाणले असे जे अभिमानाने म्हणतात.त्यांना परमात्मस्वरूप कळले नाहीच. शेवटी अशा ज्ञानाच्या अभिमानाने आपल्या स्वरूपास मात्र विसरतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते ज्ञानाचे विषय नाही असे समजून मी जाणला. त्यामुळे तो ज्ञानरूपानेच माझ्या स्वरूपांच्या ठिकाणी ऐक्य पावला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading