ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.636

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग  ६३६

पुरे जरी म्हणों तरी अमित्य पुरला । पुरोनियां उरला तेजःपुंज वो माय ॥१॥ ज्ञानाचे खाणीं माणिकें निर्वाणीं । लाधलें मी निर्गुणी निरालंबी वो माय ॥२॥ आत्मत्वाचिया परी खेवणिली भूषणें । तें मीं आवडीचें लेणें लेईलें वो माय ॥३॥ हा सुजडु जडला विटेसी लाधला । त्या रखुमादेविवरा विठ्ठला मी न्याहाळी वो माय ॥४॥

अर्थ:-

परमात्म्याच्या एका अंशावर जगत आहे. हे गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे. यावरुन परमात्मा जगताचे बाहेर अनंत अंशाने उरलाच आहे. जगतांत परमात्मा पूर्ण भरला आहे असे म्हटले तरी त्याहीपेक्षा तो अमित्य’ म्हणजे अपरिमित ‘स्वप्रकाश’ म्हणजे पूर्ण ज्ञान स्वरुपाने आहेच.त्याच्या स्वप्रकाश ज्ञानाच्या खाणीत मोक्षासारखी माणिकं मला मिळाली. आणि आपल्या स्वताच्या आश्रयावर असणाऱ्या सच्चिदानंद परमात्मा स्वरुपास मी मिळालो. आतां मी आपल्या स्वरुपावर आकाशादि प्रपंचाची भूषणे. आनंदाने धारण केली आहेत. त्यामुळे माझ्या स्वरुपाला प्रपंचापासून कांही एक धक्का लागणार नाही.ज्यांच्या स्वरुपाशी मी एकरुप झालो. ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल, यांना मी आनंदाने पाहात आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading