ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.632

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६३२

अंजनी अंजन साधिले निधान । द्वैताद्वैत धन विज्ञानेसी ॥१॥ सारिलेंसे द्वैत अद्वैत सकळ । निर्गुण निर्मळ निवळलें ॥२॥ साध्य साधक वस्तु आलिया हातां । मुरडोनी पाहतां वस्तुमय ॥३॥ ज्ञानदेवीं साध्य अज वस्तूंचें । देहीं देह साचें नुरे तरी ॥४॥

अर्थ:-

बुद्धीरूप नेत्रामध्ये द्वैताद्वैतात एकरूपाने असलेले जे ब्रह्म त्याच्या निःसंदेह ज्ञानाचे डोळ्यांत अंजन घालून मोक्षरूपी निधान म्हणजे ठेवा मी स्वाधीन करून घेतला. व त्यामुळे द्वैत व अद्वैत यांचा सर्वतोपरी निरास होऊन (अहं ब्रह्मास्मि वृत्तिचाही लय होऊन) निर्गुण अशी वस्तु माझ्या अनुभवास निःसंदेहपणे आली. मुमुक्षुच्या हातांत साध्य जी परमात्म वस्तू ती आत्मत्त्वाने आली असता तो मुमुक्षु आपल्या दृष्टीचे बर्हिमुखत्त्व टाकून अंतर्दृष्टीने पाहू गेले असता त्यास सर्व परमात्म रूपच दिसते. अज म्हणजे परमात्म वस्तू ती याच देहात साध्य झाली आहे. म्हणून देहाला सत्यत्व तरी कोठून राहणार? असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading