ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.606

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०६

तुडतालेवांचूनी अवस्था काईंसी । दुजे तरी बोलो कवणासी गे माये ॥१॥ अनुमानालागी नुरिजे उरी । सांगता लोकाचारी लाजिजे ॥२॥ अबोलणेसी बोलणे विनोदें । बापरखुमादेविवरा विठ्ठला गुणनिधि ॥३॥

अर्थ:-

तुडतालेवांचूनी म्हणजे प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय परमात्मप्राप्ती कशी होणार तसेच परमात्मज्ञानाविषयी अनधिकारी मनुष्याजवळ बोलून उपयोग तरी काय? अनुमानाने त्या परमात्म्याची गोष्ट चार लोकांतही सांगण्या जोगे नाही. कारण सर्व सामान्य लोक त्याचे आधिकारी नाही. म्हणुन त्यांच्याजवळ परमात्म्याविषयी काही बोलायचे तर लाज वाटते. बोलायचे झाले तर माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्याशीच बोलावे हेच बरे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading