👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४१
रसने वो रसु मातृके वो माये ॥ रमणि ये माये रमणिये । रामनामामृत रस पी जिव्हे ॥ निवृत्तिदासा प्रिय । माय रमणिये माय रमणिये ॥
अर्थ:-
हे जिव्हे तु सर्व रसांची मातृका देवता आहेस. तुझ्या अंगभूत रमणियात्वाने तु रमवणारी आहेस. त्यामुळे तो रामनामरस पिऊन घे. व त्यामुळे तु रमणिय झाली असल्यामुळे तु निवृत्तिनाथांना प्रिय आहेस.असे माऊली सांगतात