निकट असतांची देव । न
3258.
निकट असतांची देव । नेणती ते अहंभाव ॥१॥
ऐसे व्यापले मूढपणें । विसरले जनार्दने ॥२॥
जे पासाव सर्व युक्ति । तयाते मुमुक्षु वदती ॥३॥
ऐसा ज्ञानियाचा भाव । तया देवपण दिसे वाव ॥४॥
ज्ञानविज्ञान नको देवा । मज चरणाजवळीं ठेवा ॥५॥
एका जनार्दनी वाणी । दुजी नको अंतःकरणी ॥६॥
