कैसे करू ध्यान कैसा
343.
कैसे करू ध्यान कैसा पाहो तुज । वर्म दावी मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा । कोण्या भावे देवा आतुडसी ॥धृपद॥
कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणू । जाणू हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती । कैसी स्थिती मती दावी मज ॥३॥
तुका म्हणे जैसे दास केले देवा । तैसे हे अनुभवा आणी मज ॥४॥
अर्थ :
संत तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझं कस ध्यान करू, आणि तुला कसा पाहु, देवा मी तुझ कस ध्यान करू, आणि तुला कसा पाहू कृपया तुला पाहायचं आणि तुझा ध्यान करण्याचं वर्म मला या याचकास तू दाखव. तुझी भक्ती कशी करू, तुझी सेवा कशी करू, कोणत्या भावाने तुझी सेवा कशी करू कोणत्या भावाने तू मला प्राप्त होशील तेही मला तू सांग. तुझ्या विषयी मी कस गाऊ, तुझी कीर्ती कशी वर्णन करू, आणि तुला कस ध्यान करून लक्षात आणू, आणि माझ्या बुद्धीची स्थिती कशी असावी तो मार्ग तू मला दाखव. तू मला जसे तुझे दास केलेस तसा तुझा अनुभव मला तू आणून दे असे संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात.
