वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

विठ्ठलु नाही जये शरी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075071 · अभंग क्र. १५४

154.
विठ्ठलु नाही जये शरीरी । वाया का गा जन्मले संसारी ।
विठ्ठलु नाही जये नगरी । ते अरण्य जाणावे ॥
विठ्ठलु नाही जये देशी । स्मशान भूमि ते परियेसी ।
रवि शशिवीण दिशा जैसी । रसना तैसी विठ्ठलेवीण ॥
विठ्ठलावेगळे जितुके कर्म । विठ्ठला वेगळा जितुका धर्म ।
विठ्ठला वेगळे बोलती ब्रह्म । तितुकाही श्रम जाणावा ॥
सच्चिदानंद घन । पंढरिये परिपूर्ण । कर डेवोनिया जघन ।
वाट पाहे भक्तांची । विठ्ठलेवीण देवो म्हणती ।
ते संसार पुढती पावती । विठ्ठलावीण तृप्ती । नाही प्रीती विठ्ठलेवीण ॥
श्री गुरु निवृत्तीने दिधले । ते प्रेम कोणे भाग्ये लाधले ।
बापरखुमादेवीवर विठ्ठले । ऐसे केले ज्ञानदेवा ॥

अर्थ :
ज्या शरिरी विठ्ठल नाही ते उगाच जन्मले व ज्या नगरात विठ्ठल नाही ते अरण्य समजावे. विठ्ठल नसलेला देश स्मशान आहे तर ज्या जिभेवर विठ्ठल नाही ते चंद्र सुर्याशिवाय दिशा असण्यासारखे आहे. विठ्ठला वेगळे कर्म, धर्म व ब्रह्म म्हणजे वाउगा श्रमच आहे. ते परिपुर्ण सच्चितानंद धन कमरेवर हात ठेऊन भक्तांचे वाट पाहात आहे. जे विठ्ठल सोडुन इतर दैवते मानतात ते परत संसाराला येतात त्या विठ्ठलावीण प्रिती व तृप्ती ही नाही. हे प्रेम निवृत्तिनाथांकडुन मिळाले व माझे पिता व रखुमाईचे पती असलेल्या विठ्ठलामुळे मला प्राप्त झाले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग