वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

नाथिले आभाळ जेवी का

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074489 · अभंग क्र. ४८५

485.
नाथिले आभाळ जेवी का गगनी ।
माया मुळींहुनी तैशी जाहली ॥१॥
ब्रह्मादिक काळ व्याली हे ढिसाळ ।
आथी रजस्वला इयेपरी ॥२॥
विवर्तक जाली विस्तारिले जग ।
नव्हे भिन्न भाग एकमेव ॥३॥
मायोपाधी तेचि जाहले सगुण ।
येर ते निर्गुण जैसे तैसे ॥४॥
तेचि निरुपण तोचि सर्वेश्वर ।
म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी ॥५॥

अर्थ :
आकाशांत दिसणारे ढग जसे आकाशातच नाहीसे होतात. त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर ब्रह्मावर भासणारी माया ब्रह्मरुपच होते. ब्रह्मदेवापासून मुंगी पर्यंत काळादि एवढे मोठे जगत सामान्य स्त्रीप्रमाणे ह्याच मायेपासून निर्माण झाले. वस्तुतः ब्रह्मावर विस्तारलेल्या जगताला ती विवर्तक मिथ्या भासवण्यात कारणीभूत झाली. ती ब्रह्माहून भिन्न ही नाही व ब्रह्माशी एकमेव अभिन्नही नाही तेच ब्रह्म मायोपाधीमुळे सगुण झाले. त्या उपाधीचा बाध झाला की ते पूर्ववत निर्गुण आहे, तो राजयोगी भगवान श्रीकृष्ण सगुणही आहे व निर्गुणही आहे, असे वर्णन वेदशास्त्राने केले आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग