अनुतापावांचुनी नाम न
3231.
अनुतापावांचुनी नाम न ये मुखा । वाउगाचि देखा शीण होय ॥१॥
मुख्य तो संकल्प अनुताप वाहे । मग चित्त होय शुद्ध तेणे ॥२॥
अनुताप जाहलिया सहज समाधी । तुटेल उपाधी सहजचि ॥३॥
एका जनार्दनी अनुतापे पाहे । मग देव आहे जवळी तया ॥४॥