मी अवगुणी अन्यायी ।
121.
मी अवगुणी अन्यायी । किती म्हणॊन सांगो काई ।
आता मज पायी । ठाव देई विठ्ठले ॥१॥
पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर ।
राहो नेदी स्थिर । एके ठायी निश्र्चळ ॥२॥
अनेक बुद्धिचे तरंग । क्षणक्षणा पालटती रंग ।
धरु जाता संग । तंव तो होतो बाधक ॥३॥
तुका म्हणे आता । अवघी तोडी माझी चिंता ।
येउनी पंढरीनाथा । वास करी हृ्दयी ॥४॥
