तुज ऐसा कोण उदाराची
222.
तुज ऐसा कोण उदाराची राशी । आपुलेंची देसी पड दासा ॥१॥
शुद्ध हीन काही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देही ॥२॥
भावे हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्ताच्या परी नावडती ॥३॥
नवजासी जेथे दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥
तुका म्हणे ऐसी ब्रीदे तुझी खरी । बोलतील चारी वेद मुखे ॥५॥
