वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 61. कालिया मर्दन

राहू नका येथे जावे स

🙏 4. संत नामदेव · ABH-083799 · अभंग क्र. ११९

119.
राहू नका येथे जावे समुद्रासी । सांगे हर्षाकेशी सक-ळिका ॥१॥
तुझिया मस्तकी असे माझा चरण । न भक्षी तुज जाण पक्षीराज ॥२॥
दिव्य सुमनाच्या घालिताती माळा । पूजिती सांवळा बाप माझा ॥३॥
अनर्ध्य रत्नांचे देती अलंकार । श्रीमुख सुंदर पहाताती ॥४॥
जांबुनदातटी घालिती भोजन । निघती तेथून सक-ळिक ॥५॥
आला भगवान आनंदले गडी । उभारिती गुढी जन तेव्हा ॥६॥
काळिया आख्यान स्मरे जो मानसी । न डंखिती त्यासी सर्पकुळे ॥७॥
अहर्निशी याचे करी जो पठण । नामा ह्मणे विघ्न नाही तेथे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग