एकविध आम्ही न धरु पा
194.
एकविध आम्ही न धरु पालट । न संडू हे वाट सांपडली ॥१॥
म्हणवूनी केला पाहिजे सांभाळ । माझे बुद्धिबळ पाय तुझे ॥२॥
बहुत न कळे बोलता प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥३॥
तुका म्हणे अगा जीवींच्या जीवना । तूंचि नारायणा साक्षी माझा ॥४॥
