कैलासींचा देव भोळा च
7.
कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज ॥१॥
तयाचिया पाया माझे दंडवत । घडो आणि प्रीत जडो नामी ॥२॥
जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी । तिजा नेत्रज्वाळी जात वेद ॥३॥
कंठी काळकूट डौर त्रिशूल हाती । सर्वांगी विभूति शोभतसे ॥४॥
गळा रुंडमाळा खापर हस्तकी । रामनाम मुखी सर्व-काळ ॥५॥
व्याघ्रचर्मधारी स्मशानी राहिला । संगे भूतमेळा बिरा-जित ॥६॥
नामा ह्मणे नामे नासोनिया पाप । करी मुखरूप भक्तांलागी ॥७॥
