वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

नाचे गाणे माझा जवळील

🙏 3. संत तुकाराम · ABH-079885 · अभंग क्र. ४०००

4000.
नाचे गाणे माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥
तुम्हा निद्रा मज आज्ञा ते स्वभावे । उतरूनि जीवे जाईन लोण ॥धृपद॥
एकाएकी बहु करीन सुस्वरे । मधुर उत्तरे आवडीने ॥२॥
तुका म्हणे तू जगदानी उदार । फेडशील भार एकावेळे ॥३॥

अर्थ :
देवा तुमच्या भजनामध्ये नाचणे व तुमचे पूर्ण वर्णन गाणे हाच माझा खरा भक्तिभाव आहे आणि तोच अगदी माझ्या जवळचा आहे आणि माझ्या अंत:करणामध्ये जो माझा भक्तिभाव निर्माण होईल तो मी तुम्हाला सांगत राहीन. देवा तुम्ही झोपी गेलात तर ती माझ्यासाठीही झोपी जाण्याची सहजच आज्ञा होते आणि जाताना मी तुमच्यावरुन जीवाचे निंबलोण उतरुन जाईन. देवा मी एकातामध्ये तुमच्या गुणाचे गायन अतिशय व फार मधुर शब्दात व सुस्वरात करीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही जगाला दान देण्याविषयी फार उदार आहात त्यामुळे केव्हा तरी माझ्यावर उदार होताल आणि माझ्या माथ्यावरचा प्रपंचाचा भार एकवेळेला तुम्ही नक्की उतरवाल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग