माथा पडता पाला| सांब
575.
माथा पडता पाला| सांब तेणे संतोषला ॥१॥
होता प्राचीनाचा ठेवा | बहु दुर्लभ मानवा ॥२॥
काय भक्तीचा जिव्हाळा | काय त्याचे अंगी कळा ॥३॥
बहु केली दुष्ट कर्म | सेखी तोचि जाला धर्म ॥४॥
नामा म्हणे भोळा देव | सांगायाचा हाचि भाव ॥५॥
