वहिनीनें आम्हा काय ध
3465.
वहिनीनें आम्हा काय धाडियेले । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥
म्हणे माझे वस्त्र ग्रंथीं कोठे आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥
बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्वता बोलतसे ॥३॥
सोडोनिया ग्रंथी समग्र ते केले । पुढे वोढविले कर देवे ॥४॥
एक ग्रास मुखी घालितांचि जाण । एका जनार्दनी खूण समजली ॥५॥
