(छ. शिवाजी महाराजांन
3417.
(छ. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नेण्याकरता घोडाकारकून अबदागिरी पाठविली त्यावेळी कारकुणा बरोबर पाठविलेला निरोप)
मुंगी आणि राव । आम्हा सारिखाची जीव ॥१॥
गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फासा ॥धृपद॥
सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ॥२॥
तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सांवळे ॥३॥
अर्थ :
मुंगी असो किंवा राजे असो आम्हाला दोन्हीही सारखेच आहेत. आता आमचा मोह आणि आशा, इच्छा, अपेक्षा गेले आहेत कळी काळाचा फास देखील आम्ही तोडला आहे. सोने आणि माती या दोन्हीचीही जागा आमच्या चित्तामध्ये सारखीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या घरी वैकुंठाहून सावळे ब्रम्ह आले आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची इच्छा अपेक्षा राहिली नाही.
