थिल्लर ते नेणे सागरा
1907.
थिल्लर ते नेणे सागराचा अंत | मुंगीस अग्नीत रिघ नाही ॥१॥
श्वास काय जाणे मेरूचे प्रमाण | कोसळल्या गगन न कळे त्यास ॥२॥
अंध काय जाणे कैसा उगवे दिन | पाषाणा पर्जन्य न कळे जेवी ॥३॥
देहवंत जीव काय जाणे देव | नामा म्हणे भाव काय तेथे ॥४॥
