योग याग यज्ञ इच्छिती
1863.
योग याग यज्ञ इच्छिती कामना | परि केशव निधाना विसरला ॥१॥
नेणेंचि हे मन भुलले अज्ञाने | यातायाति पतन भोगू पाहे ॥२॥
ज्याचेनि जाहले तुझे हे शरीर | त्याचा नामोच्चार ना ये वाचे ॥३॥
नामा म्हणे कांरे नेणसी अझुनी| केशवचरणी अनुसरे का ॥४॥
